Animation As A Career !

image
Info
Comments
 • There are exciting career opportunities in animation & multimedia industry .

  People keep asking me questions like what is Scope of Animation & Multimedia ? Career options ?
  Work opportunities ? Payment Scale ?

  As a practicing professional animator and trainer I completely understand these doubts arising in parents & students mind. Answer to these questions is YES it is true that animation and multimedia Field has plenty of Career Opportunities & Extravagant Salaries.

  Animation, multimedia & Visual Effects are most popular and grooming Industries of 21st Century. Animation & Multimedia sector provides lucrative opportunities of career in India as well as Abroad . The Person who wants to learn these technologies requires Consistency, Passion and Patience to get exact Knowledge & Experience.

  Animators and Multimedia Developers have to work very hard and Relentlessly. This field Requires much efforts to make every Project Unique & Special. The base of animation & Multimedia is nothing but creativity and imagination the developer has. The drawing course definitely support to enhance the creative skills required for animation. Every Animator & Multimedia Developer has to take Initial Drawing training. A four year Drawing course will definitely help in 2 D & 3 D animations, gaming, VFX. Animator & Multimedia Developer / Professionals have to understand & Implement new Trends Consistently.

  Job profiles like Animator , Graphic Designer, Multimedia Developer, Gaming Developer, Character Designer, Key Frame animator, 3 D modeler, Layout Artist etc.

  DRAW & YOU WILL SUCCEED ….!!!!

  ॲनिमेशन एक करीयर !

  ॲनिमेशन क्षेत्रा बद्दल पालक आणि विद्यार्थयान मध्ये गैरसमज असतात. त्यामुळे बरेचदा माझ्याकडे पालक येतात विचारायला की मुलांना ॲनिमेशन मध्ये शिक्षण घेऊ दे का किंवा काय करियर अपॉर्च्युनिटी आहेत. मुलांच्या बाबतीत पालकांनी करिअर बद्दल साशंक आणि सजग असणं सहाजिक आहे. मग माझा त्यांना प्रश्न असतो की , तुम्हाला तुमच्या मुलाने ॲनिमेशन मध्ये का करिअर करावं असं वाटतं ? ॲनिमेशन तुमच्या मुलाला आवडते का ? ॲनिमेशन बद्दल तुम्हाला आणि तुमच्या मुलांना काय माहीत आहे?

  मग काही ठरलेली उत्तर येतात. ॲनिमेशन मध्ये करिअरमध्ये चांगला पैसा मिळतो किंवा याला चित्र बऱ्यापैकी काढता येते किंवा आमच्या ओळखीतला नातेवाईक बाहेरच्या देशात असतो वगैरे वगैरे.

  मग मी त्या मुलाला किंवा मुलीला हा प्रश्न परत विचारतो. मुलगा किंवा मुलगी पालकांकडे बघून सांगतात की त्याना चित्र काढायला जरा आवडतात.

  काही पालक मुलांना केवळ डिग्री आणि डिप्लोमासाठी दुसऱ्या साईडला सुद्धा प्रवेश घेतात आणि फक्त डिग्रीसाठी तो बिचारा मुलगा किंवा मुलगी दोन दगडावर पाय ठेवतात. पण त्यामुळे एक महत्वाचा प्रश्न अनुत्तरीत राहतो की मुलाचा किंवा मुलीचा कल आणि Aptitude ही ॲनिमेशन कडे आहे का ???

  इथे अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की जर दहावीनंतर जर का तुम्ही Aptitude टेस्ट करून घेतली तर मुलांना जास्त सोपे जाते की कुठलं करिअर निवडावे. Aptitude टेस्ट घेणाऱ्या सुद्धा संस्था भरपूर आहेत जसे की पुण्यामध्ये ज्ञानप्रबोधिनी.

  किंवा काहीजण ऑलरेडी दुसऱ्या अभ्यासक्रमात अपयशी झाले असल्यामुळें ॲनिमेशन कडे आलेले असतात अथवा जॉब मिळत नाही किंवा आता निवडलेल्या करिअरमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळायला त्रास होतो म्हणून देखील ऑप्शन म्हणून ॲनिमेशनचा विचार केला जातो.

  यावेळेस त्यांचे सगळे ऐकल्यानंतर मला त्यांना सांगावस वाटतं की ॲनिमेशन तुम्हाला जेवढे दिसते तेवढंच सहज-सोपे क्षेत्र नाही.

  हे खरं आहे की ॲनिमेशन मध्ये भरपूर करिअर संधी आहेत, चांगले पगार आहेत पण या क्षेत्रातदेखील तितकेच कष्ट आहेत आणि Consistency विथ Patience ची गरज असते. त्याला तुम्ही इतक्या सहजतेने घेऊ शकत नाही.

  अ‍ॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स हे २१व्या शतकात सर्वात अधिक मागणी असणारं असे क्षेत्र आहे. अ‍ॅनिमेशन हा मल्टिमीडिया क्षेत्राचा एक भाग आहे.

  मल्टिमीडिया या नावातच म्हटल्याप्रमाणे संपर्काचे विविध (मल्टी) मार्ग वापरणारे असे हे क्षेत्र आहे. व्हर्च्युअल जगातील काम करताना या क्षेत्रात टेक्स्ट (संदेश/मजकूर), इमेजेस (चित्र/फोटो), ग्राफिक्स, अ‍ॅनिमेशन, ऑडिओ (आवाज) आणि व्हिडीओ (दृश्य) आदी माध्यमांचा वापर करावा लागतो. या क्षेत्रात यशस्वी करिअर करण्यासाठी तुमच्याकडे कल्पकता, चित्रकलेचा व्यासंग आणि मल्टिमिडीया मधील सॉफ्टवेअर चे प्रशिक्षण घेतलेले असायला हवे. भारतात तसेच परदेशातही या क्षेत्रात करिअर करण्याच्या भरपूर चांगल्या संधी उपलब्ध आहेत.

  अ‍ॅनिमेटेड फिल्म्ससाठी काम करणे, तसंच टीव्ही, अ‍ॅडव्हर्टायझिंग क्षेत्रातही तुम्हाला नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. अ‍ॅनिमेटर्सना साधारणपणे स्टोरी बोर्ड आर्टिस्ट, मॉडेलर्स, लेआउट आर्टिस्ट, कॅरेक्टर अ‍ॅनिमेटर्स, कम्पोझिंग आर्टिस्ट, एडिटर्स, टेक्श्च्युअर आर्टिस्ट इ. विविध पदांवर (जॉब प्रोफाइल) काम करावे लागते.

  चित्रपट आणि टीव्ही माध्यमातून मनोरंजन करणे हे या प्रोफेशनचं मुख्य काम असले, तरी बऱ्याचदा बिझनेस, सेल्स, इंजिनीअरिंग, शिक्षण आणि अ‍ॅडव्हर्टायझिंग या क्षेत्रातही अ‍ॅनिमेशन तंत्राचा वापर केला जातो. फॅशन डिझायनिंग, इंटिरीअर डिझायनिंग, तसंच वैद्यकीय (मेडिकल), कायदा (लीगल) आणि इन्शुरन्स कंपन्यांना त्यांचे प्रेझेंटेशन आणि मॉडेल बनवण्या साठीही याच तंत्राचा वापर करावा लागतो. मोबाइल आणि व्हिडीओ गेम इंडस्ट्रीजनाही चांगल्या अ‍ॅनिमेटर्सची खूप गरज असते.

  परंतु या सगळ्या क्षेत्राचा पाया हा फक्त आणि फक्त तुमची कल्पकता आहे. आता कल्पकता ह्या विषया बद्दल बोलायचं झाले तर मला असे वाटतं की प्रत्येक माणूस हा कल्पक असतो. पण या क्षेत्रात जर तुम्हाला कल्पकता दाखवायची असेल तर त्यांच्यासाठी चांगले माध्यम आहे चित्रकला.

  चित्रकले मुळे तुम्ही तुमची कल्पकता स्पष्टपणे वापरू शकता. चित्रकले मुळे तुमची कल्पकता वाढते व तिचा विकास होतो.

  2 डी आणि 3 डी ॲनिमेशन या क्षेत्रामध्ये तर मला असे वाटते की ड्रॉईंग ला पर्याय नाही.

  गेमिंग आणि VFX साठी सुरुवाती- सुरुवातीचं चित्रकलेचे जुजबी प्रशिक्षण उपयोगी पडू शकते.

  देशात विदेशात खूप चांगल्या पद्धतीचे चित्रकलेचे शिक्षण देणाऱ्या कित्येक संस्था आहेत.

  मला असे वाटते की चार वर्षाचा जर चित्रकलेचा शास्त्रशुद्ध कोर्स करून नंतर ॲनिमेशन कडे वळल्यास खूप फायदा होऊ शकतो.

  ॲनिमेशन, ग्राफिक्स आणि मल्टिमिडीया मध्ये प्रशिक्षण देण्यासाठी खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही प्रकारच्या अभ्यासक्रम शिकवण्यारया अनेक संस्था भारतातील सर्व लहान मोठ्या शहरांमध्ये आहेत आणि त्या उत्तम प्रशिक्षण देतात.

  ॲनिमेशन देखील शिकत असताना त्यांना मार्केटमध्ये होणाऱ्या नवीन घडामोडी थोदे लक्ष ठेवले तर तरी त्याच्या फायद्याचं होऊ शकतो.

  अनेक संस्था इंटर्नशिप देतात आणि कोर्स पूर्ण झाल्यानंतर Interview ची व्यवस्था करतात. काही संस्था नोकरीची संधी देखील उपलब्ध करून देतात.

  ॲनिमेशन चा करियर पर्याय म्हणून विचार करताना ॲनिमेटर्स आणि संबंधित व्यावसायिकांसाठी ग्राफिक डिझायनर, मल्टीमीडिया डेव्हलपर आणि गेम डेव्हलपर, कॅरेक्टर डिझायनर्स, की फ्रेम ॲनिमेटर्स, 3 डी मॉडेलर्स, लेआउट कलाकार इ. साठी विविध संधी तयार झाल्या आहेत. ज्यांच्याकडे व्यावसायिक कौशल्ये आणि गुंतवणूकीसाठी निधी आहे ते ॲनिमेटर आणि मल्टीमीडिया व्यावसायिक, स्वतंत्रपणे काम करू शकतात किंवा त्यांचे स्वत: चे उद्योग सुरू करू शकतात.

  In short animation is really good option as an career. 
DRAW….. And you will be the Best !

   

  Animation As A Career !

  It's only fair to share...Share on FacebookTweet about this on TwitterShare on Google+Share on LinkedInPin on Pinterest
 • Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *